‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.

सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रकांत पतरंगे  गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी...
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर