रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 

रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : ( ता.3) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतुक जोमात सुरू आहे. अश्यातच एका अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिपर(MH - 40 BH 8080)ने स्कूटी वरून जाणाऱ्या एका महिलेला उडविल्याची हृदयविकारक घटना शुक्रवारी गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे दुपारच्या सुमारास घडली. यात महिलेचा घटनास्थळी च मृत्यू झाला. रामेश्वरी धनलाल नागपुरे वय 45 असे मृतक महिलेचे नाव असून ती कटंगी कला येथील रहिवाशी आहे. ती मुलगी वैष्णवी सोबत स्कूटी ने मध्य प्रदेशातील आरंभा येथे सासू च्या  मैय्यत कार्यक्रमासाठी जात होती असतातच रेती भरून  येणाऱ्या टिप्पर ने त्यांना  धडक दिली त्यात सदर महिला घटनास्थळीच मरण पावली. तर मुलगी वैष्णवी गंभीररित्या जख्मी झाली आहे.घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आक्रोश करीत रस्ता अडवून धरला व अवैध रेती वाहतुक बंद करण्याची मागणी लावून धरली.त्यामुळे काही काळ येथील परिस्थिती तणावपूर्ण होती.पोलिस उपविभागीय अधिकारी बानकर, तहसीलदार पठाण तसेच इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. दोन दिवसा पुर्वी सुद्धा जवळील तेढवा येथे अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने आशिक म्हात्रे नामक युवकाचा अपघात झाला होता हे विशेष.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज  ​छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा...
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर 
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी वसुमना पंत रुजू ; शुक्रवारी स्वीकारली पदाची सूत्रे
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक