रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर, दि. १८/५/२०२६ चंद्रपुरातील भानापेठ प्रभागाअंतर्गत येत असलेल्या रामाळा तलावाच्या स्वच्छते करिता तलावातील पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून तलावातील पाण्याच्या कमतरतेमुळे तसेच इतर काही कारणांमुळे तलावातील मासोळ्या मरत असल्याचे आढळून आले आहे. परिणामतः या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली असून रोगराई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर शिवसेनेतर्फे चंद्रपूर मनपा आयुक्तांना 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आला असून येत्या 24 तासात रामाळा तलाव स्वच्छ न केल्यास व यात मृत पडलेल्या मासोळ्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने तलावातील मृत पडलेल्या मासोळ्या उचलून त्या चंद्रपूर मनपा कार्यालय प्रांगणात आणून टाकण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.
या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा शिवसेनेचे ललित कासट यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.चंद्रपूर मनपा आयुक्त यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच्या व्हाट्सअप वर हे पत्र पाठविण्यात आले असल्याचे ललित कासट यांनी सांगितले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List