विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला

विकास लवांडेंवर शाईफेक;कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला

आधुनिक केसरी न्यूज 

रोहित दळवी 

पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे  यांनी वारकरी सांप्रदायातील घुसखोर म्हणत 20 जणांची यादी जाहीर केली होती, या यादीवरुनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.किर्तनकार संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी ही  शाईफेक केली असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला असून याचा व्हिडिओही समोर आला आहे.या घटनेनंतर विकास लवांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे हे प्रवचनकार असून त्यांचे प्रवचन हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा या गावी एका दशक्रिया विधी साठी होते ते प्रवचन झाल्यानंतर आळंदी म्हातोबा गावापासून एक किलोमीटर पुढे आले त्यांच्या गाडीला  आडवत त्यांना खाली उतरून जाब विचारण्यात आला तु आमच्या गुरुमाऊलींवर आमच्या संतांवर टीका करतो त्यांना घुसखोर म्हणतो असे म्हणत स्वतःला कीर्तनकार म्हणणारे संग्राम भंडारे यांच्यासह दहा ते पंधरा गोरक्षक युवकांनी विकास लवांडेंवर तीन ते चार बाटल्या शाई ओतली व धक्काबुक्की करत तेथून पळ काढला.

 काय म्हणाले विकास लवांडे ? वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही  10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी म्हातोबा तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे.नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे .पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे  सत्याग्रह करत आहे.

आमच्याकडे पिस्तूल नव्हते संग्राम भंडारे
दरम्यान माध्यमांशी बोलताना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी आमच्याकडे पिस्तूल नव्हते पिस्तूल असते तर वेगळच काय झाल असत अशी प्रतिक्रिया दिली आम्ही फक्त शाही फेक केली आहे तसेच आमच्या संतांचा गुरुमाऊलींचा अपमान आम्ही सहन करणार नाही, लवांडेंचा एकरी शब्दात उल्लेख करत त्यांची त्याची पात्रता नाही अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज  पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन...
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड
रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश
बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही : सुनेत्रा पवार