सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी
मॉरिशसमध्ये २५ जून रोजी आयोजन
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर, दि.१८: मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ कवा सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास भाऊराव फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ जून रोजी मॉरिशस या ब्देशात हे संमेलन होणार आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी कळवले आहे. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन गुरुवार दि.२५ जून २०२६ रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम या संमेलनात पार पडणार आहेत. मॉरिशस येथील मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती या संमेलनात राहणार असल्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी कळवले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List