Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक

Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक

आधुनिक केसरी न्यूज 

बाळासाहेब भोसले

बुलढाणा : सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या निवासस्थानासमोर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून सरकारविरोधातील असंतोष अधिक तीव्र होताना दिसत आहे. अन्नत्यागामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येत असतानाच त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी आंदोलनाला वेगळे स्वरूप दिले. त्यांनी कार्यकर्त्यांसह बुलढाणा शहरातील रस्त्यांवर उतरून सरकारच्या निषेधार्थ प्रतीकात्मक भीक मागण्याचे आंदोलन केले.“हे सरकार कंगाल आहे, शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे कंगाल सरकारसाठी भीक द्या,” अशा घोषणा देत नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भीक मागण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..! दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक (वर्ग 3) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक
गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन
जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
खांडवी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाच्या वतीने रास्तारोको..!
खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 
बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!