पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

बाळासाहेब भोसले

सिदखेखराजा  : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी ठरली आहे. या अपघातात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेवराव राठोड (वय ५५ वर्षे) तसेच सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे या दुर्घटनेत दुःखद निधन झाले. धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या दोन्ही महिला गोदावरी नदीत बोट उलटल्याने झालेल्या अपघाताच्या बळी ठरल्या. या दुर्घटनेत इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य तत्काळ राबविण्यात आले असून जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे बिबी परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत महिलांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!