जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
आधुनिक केसरी न्यूज
गंगापूर : गंगापूर–वैजापूर रोडवरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात स्कुटीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पल्सरस्वार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हरीभाऊ डोंगरे (वय ४०) हे सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गंगापूर शहरातून स्कुटीने वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा परिसरात त्यांच्या स्कुटीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टू-ट्वेंटी पल्सर दुचाकीने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपक डोंगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.डोंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, पल्सरस्वारावर गंगापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव करीत आहेत. कुटुंबावर दुःखाचा डोंगर मृत दीपक हरीभाऊ डोंगरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List