देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत

आधुनिक केसरी न्यूज 

देगलूर माणिक सुर्यवंशी

नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून देगलूर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर धडक कारवाई केली असून, एकूण २० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा ६ जुलै २०२६ रोजी देगलूर पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून अवैध रेती वाहतुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देगलूर शहराजवळील खानापूर फाटा परिसरात तात्काळ सापळा रचला. संशयास्पद वाटणारा एक लाल रंगाचा हायवा टिप्पर (क्रमांक: TS-36-T-3865) या परिसरात आला असता पोलिसांनी तो अडवला.
२० लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी वाहनाची बारकाईने तपासणी केली असता, त्यात कोणतीही वैध पावती किंवा परवाना नसताना अवैध रित्या लाल रेतीची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्येमाल जप्त केला:
 ७ ब्रास लाल रेती(अंदाजे किंमत: ₹४९,०००/-)
 हायवा टिप्पर (अंदाजे किंमत: ₹२०,००,०००/-)
 एकूण जप्त मुद्देमाल: ₹२०,४९,०००/- (वीस लाख एकोणपन्नास हजार रुपये).

चालकावर गुन्हा दाखल 
याप्रकरणी पोलिसांनी हायवा चालक दीपक हणमंत लोणे (वय ४४ वर्षे, रा. मडगी, ता. देगलूर, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई ही यशस्वी कारवाई नांदेडचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे आणि पोलीस अंमलदार बळीराम धुळे यांच्या पथकाने पार पाडली. नांदेड पोलिसांचे आवाहन जिल्ह्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की, कुठेही अवैध गौण खनिज वाहतूक, साठवणूक किंवा बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अशा अवैध कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
>

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत
आधुनिक केसरी न्यूज  देगलूर माणिक सुर्यवंशी नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग...
देगलूरजवळ भीषण अपघात: दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; तडखेल येथील २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर.
आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर 
समृद्धी महामार्ग प्रकरणाला मोठे वळण; APCO Infratech Pvt. Ltd. विरुद्ध परतूर पोलिसांत गुन्हा दाखल
गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत राठोडची भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड
एक पेड पिता के नाम ' उपक्रमातून पितृस्मृतीला हरित अभिवादन