दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना

दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया : २६ जून दोन भरधाव कारची आमोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही कारमधील नऊ जण जखमी झाले आहे. ही घटना २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया-तिरोडा राज्यमहामार्गावरील टिकायतपूर गावशिवारात घडली. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले असून इतर जखमींना गोंदिया येथील रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. हर्ष विजय दलवानी (२५) रा. रेव्हेन्यू कॉलोनी, गणेश नगर गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत हर्ष व त्याचे गोंदिया येथील मित्र जखमी केतन पिंकी असाटी (२१) रा. लालागल्ली, नवीन अशेाक राजगुरू (२८) रा. बाजपेई चौक, आदित्य साहिल सुंदरानी (२४) व अमीत हरीष गुरनानी (२६) दोघेही रा. सेलटॅक्स कॉलोनी हे सर्व वाढदिवसानिमीत्त दांडेगाव येथे एका हॉटेलमध्ये गेले होते. दरम्यान, पार्टी करून कार क्रमांक एमएच १३ डीएम ५५५० ने भरधाव वेगात परत गोंदियाकडे येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या कार क्रमांक एमएच ३५ बीसी १७५४ या दोन्ही कारमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत हर्षचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे मित्र जखमी झाले. तर दुसर्या वाहनातील चालक कपील राजेंद्र रहांगडाले (२२) रा. ननसरी ता. आमगाव, यश दशरथ रहांगडाले (२२) रा. धुंधाटोला, गोंदिया, शुभम व्यंकट रहांगडाले (२२) रा. अंजोरा ता. आमगाव, उदय भाष्कर रहांगडाले (२३) रा. तांडा, ता. गोंदिया व मयूर धारासिंग चव्हाण (२२) रा. अंगुर बगीचा, गोंदिया हे जखमी झाले. यापैकी एकाची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले असून इतर सर्व जखमींवर गोंदिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच गंगाझरीचे ठाणेदार वर्मा यांच्या मार्गदर्शनात ११२ चे पोलिस शिपाई दुर्योधन मारबदे व इतर पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस शिपाई दुर्योधन मारबदे यांच्या तक्रारीवरून दोन्ही कार चालकांच्या विरोधात गंगाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना दोन कारची समोरा-समोर धडक; एकाचा मृत्यू ९ जण जखमी,गोंदिया-तिरोडा महामार्गावरील टिकायतपूर येथील घटना
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : २६ जून दोन भरधाव कारची आमोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू...
अयोध्येच्या राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे पंतप्रधान मोदी व RSS चे ‘खास’ लोक; कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ
वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!