वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप

वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप

आधुनिक केसरी न्यूज 

त्रिसिंग जायभाये 

वडिगोद्री : पाचोड राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात जांभळांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांची जांभळे रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी रस्त्यावर पडलेली जांभळे गोळा करण्यासाठी अक्षरशः झडप घातल्याने काही काळ अनोखे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना मंगळवारी (दि. 23) पहाटे सुमारे 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे जांभळांची वाहतूक करणारे पिकअप (क्र. एमएच 16 सीडी 2464) मुरमा शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पलटी झाले. वाहनात सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे भरलेली होती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी अनेकांनी पिशव्या, पोती व इतर साधनांचा वापर केला. काही वेळातच मोठी गर्दी झाल्याने परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला.या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले असून जांभळांचा मोठ्या प्रमाणात मालही वाया गेला. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या मालाची नागरिकांनी केलेली लूट परिसरात चर्चेचा विषय ठरली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप वडिगोद्रीजवळ जांभळांनी भरलेले पिकअप पलटी; रस्त्यावर विखुरलेल्या जांभळांवर नागरिकांची झडप
आधुनिक केसरी न्यूज  त्रिसिंग जायभाये  वडिगोद्री : पाचोड राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात जांभळांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने सुमारे तीन...
अखेर बहूचर्चित माजी आ.गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणाचा निकाल 
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ
गोंदियाच्या 'आरोग्य देवदूत' राजश्री भोंडे यांच्या धाडसाने धावत्या ट्रेनमध्येच सुरक्षित प्रसूती; माता-बाळ सुखरूप
सावरगांव माळ नसिराबाद स्मार्ट सिटीचा मार्ग मोकळा; शासन लवकरच नोटिफिकेशन काढणार!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न प्रस्तावाला विलंब का?  विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा एल्गार
महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना