आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी

आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी

आधुनिक केसरी न्यूज 

दिपक सुरोसे 

शेगांव : दि. २० हेचि व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||
 पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||
 संतसंग सर्वकाळ | अखंड प्रेमाचा कल्होळ ||
 चंद्रभागे स्नान | तुका मागे हेचि दान ||
या अमृतमय ग्रंथ वाणी प्रमाणे श्री संत गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी ७०० च्या वर वारकऱ्यांसह ज्येष्ठ शुद्ध ७ रविवार  २१ जुन  रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे श्रींचे पालखी श्रींच्या मंदिर  परिसरातून प्रस्थान करणार आहे. श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५७  वे  वर्ष आहे. श्रींच्या पालखी समवेत ७०० च्या वर वारकऱ्यांसह, आश्वासह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल , जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, मंत्राचा नाम जप करीत वारकरी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत.

तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमी चे अंतर कापून श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे.श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम २३ जुलै ते २८ जुलै पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान च्या शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे २९ जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.
 श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर २१ जुन रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये श्रींची पालखी पोचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. २२ जुनं रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. रोजी सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे २३ व २४ जुन असा दोन दिवस श्रींच्या  पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर सुनिश्चित मार्गाने श्रींची पालखी २३ जुलै  रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे.


पाऊले चालती पंढरीची वाट...

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी
आधुनिक केसरी न्यूज  दिपक सुरोसे  शेगांव : दि. २० हेचि व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास || पंढरीचा वारकरी...
गोंदियात आंतरराज्यीय ‘पुष्पागँग’वर वन विभागाची चपराक वाहनासह तीन लाकूड तस्कर अटकेत; डोंगरगाव सहवनक्षेत्रातील धडक कारवाई
परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रँगींग समिती, पथकाची स्थापना
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू
अखेर दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद..!