डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रँगींग समिती, पथकाची स्थापना

प्रत्येक महाविद्यालयात अँटी रॅगिंग समिती स्थापन करणे बंधनकारक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रँगींग समिती, पथकाची स्थापना

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना ’अँटी रॅगिंग समिती’ व तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संदर्भात दोन्ही समित्या स्थापन करण्याच्या आल्या असून फक्त काही गठीत करण्यात आले आहे.

या संदर्भात विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१७) बैठक घेण्यात आली. व्यवस्थापन परिषद कक्षात सदर बैठक झाली. विद्यापीठ परिसर व संलग्नित महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी भयमुक्त असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठात ’अँटी रँगिंग समिती’ तसेच अँटी रँगींग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.अपर्णा अष्टपुत्रे, डॉ.आनंद देशमुख, डॉ.माधुरी सावंत, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे तर डॉ.कैलास अंभुरे हे सदस्य सचिव आहेत. सदरील बैठकीत रँगिंग प्रतिबंधात्मक मुद्यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील रँगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना व जागृती करण्यावर भर देण्याचे सुचित केले. सर्व शैक्षणिक विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशित विद्यार्थी व पालकांडून रँगिंन प्रतिबंधात्मक हमीपत्र ऑनलाईन भरुन घेण्यात प्रवृत्त करावे. सर्व शैक्षणिक विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अँटी रँगिंग सदंर्भात ऑनलाईन भरुन घेतलेली हमीपत्रे अँटी रॅगिंग कक्षास सादर करावे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकारने १२ ऑगस्ट हा दिवस अँटी रँगिंग दिवस घोषित केला आहे. या काळात सप्ताह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. अँटी रँगिंग समिती व अँटी रँगिंग पथक यांची माहिती दर्शविणारे फलक सर्व शैक्षणिक विभाग, वसतिगृह येथे दर्शणी भागात तात्काळ लावण्यात यावी. तसेच रँगिंग प्रतिबंधात्मक पोस्टर्स ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अँटी रँगिंग  संदर्भात विद्यार्थ्यांचे व पालकांचे ऑनलाईन हमीपत्र भरुन घेणे याची संपूर्ण जबाबदारी विभागप्रमुखांची राहील. त्या विषयी युनिक, प्रवेश समिती, विभागप्रमुख, पीएच.डी विभाग व पदव्यूत्तर प्रवेश विभाग यांनी एकमेकांशी समन्वय साधून परिपत्रक  काढण्याविषयी सुचित करावे. विद्यापीठ परिसरात रॅगिंन संदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही स्वरुपात तक्रार प्राप्त झालेली नसली तरीही अँटी रँगिंग पथकाने विद्यापीठ परिसरात अचानक भेटी देऊन पहाणी करावी, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
अँटी रॅगिंग पथक, तक्रार निवारण समिती स्थापन
विद्यापीठ कॅम्पस मध्ये प्रा.सुनील नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली अँटी रॅगिंग पथकाची स्थापना करण्यात आली. या समितीत डॉ.सचिन भुसारी, डॉ.मदन सूर्यवंशी, डॉ.अश्विनी मोरे, डॉ.श्वेता पाटील यांचा समावेश आहे. तर विद्यार्थी तक्रार निवारण समितीही (स्टुडंट्स ग्रीव्हन्स सेल) स्थापन करण्यात आली आहे. डॉ श्याम शिरसाट या समितीचे अध्यक्ष असून निवृत्त न्यायधीश स्वाती ठक्कर चव्हाण या लोकपाल तर डॉ.कैलास अंभुरे हे सदस्य सचिव आहेत. या समितीत अधिसभा सदस्यांचा समावेश आहे.

 विद्यापीठ कॅम्पसमध्ये जनजागृती मोहीम: डॉ. अंभुरे

विद्यापीठ कॅम्पस व सर्व संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रँगिंग प्रतिबंधक हमीपत्र भरुन घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व महाविद्यालयांनी रँगिंन प्रतिबंधक अनुपालन आवेदनपत्र भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ परिसरामध्ये रॅगिंग विषयक अनुचित प्रकार घडू नये यासाठी मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली से नो टू रॅगिंग, जॉयफूल कॅम्पस  या तत्त्वानुसार रॅगिंग प्रतिबंधक समिती व पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जाईल. या संदर्भात विद्यापीठ कॅम्पसमध्ये पोस्टर बॅनर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून १२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या दरम्यान अँटी रँगिंग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर, दि.१८: मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ कवा सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रँगींग समिती, पथकाची स्थापना
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू
अखेर दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद..!
दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक
गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन