जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

आधुनिक केसरी न्यूज 

सिद्धार्थ वाठोरे

हदगाव : अमावास्येनिमित्त माहूर येथील कैलास टेकडीवर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांच्या दुचाकीला भरधाव बोलेरो जीपने मागून जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील चिल्ली गावाजवळ घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बालाजी बोरकर (वय ३८, रा. शिरड, ता. हदगाव) असे असून, ते आपल्या सहकारी अवधूत तवर यांच्यासोबत दुचाकी (एमएच २६-बीडब्ल्यू १९८२) वरून माहूर येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, मागून भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो जीपने (एमएच १२-ईजी ९४६६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बालाजी बोरकर हे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर जीपने त्यांना काही अंतर फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दुचाकी चालक अवधूत तवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत बालाजी बोरकर यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, भावजय व पुतणे असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
आधुनिक केसरी न्यूज  सिद्धार्थ वाठोरे हदगाव : अमावास्येनिमित्त माहूर येथील कैलास टेकडीवर देवदर्शनासाठी निघालेल्या दोन भाविकांच्या दुचाकीला भरधाव बोलेरो जीपने...
खांडवी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाच्या वतीने रास्तारोको..!
खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले 
बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!
बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रक व स्कुटीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड