रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश

रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश

आधुनिक केसरी न्यूज 

  श्रीकांत बरकते

कळंब : नायगाव-मुरुड रोडवरील रॉयल लॉजमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून शिराढोण पोलिसांनी आज 11/06/2026 रोजी छापा टाकला. डमी ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत 2 पिडीत महिलांची सुटका करून लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली. पोलिस स्टेशन शिराढोणचे स.पो.नि. डी.बी. कोळेकर यांच्या पथकाने दोन पंच व महिला पंचांसह लॉजवर धाड टाकली. छाप्यात सांगली जिल्ह्यातील 2 महिला आढळून आल्या. त्यांना पैशाचे आमिष दाखवून नायगाव शिवारातील रॉयल लॉजमध्ये बोलावून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. 

लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, रा. दत्तनगर मुरुड जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले. लॉज मालक अक्षय दादासाहेब घोगरे, रा. दत्तनगर मुरुड हा पळून गेला. दोघांविरुद्ध BNS कलम 143, 144(2), 3(5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 अन्वये गुन्हा रजि.नं. 141/2026 दाखल झाला आहे. पिडीत महिलांना वैद्यकीय तपासणीनंतर लातूर महिला सुधारगृहात दाखल केले आहे. पुढील तपास अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष धाराशिवचे पो.नि. शेळके करत आहेत.ही कारवाई एसपी धाराशिव मा. खोखर मॅडम, अप्पर एसपी श्री. पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एसडीपीओ कळंब श्री. संजय पवार यांच्या देखरेखीखाली झाली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!