बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना

बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना

आधुनिक केसरी न्यूज 

 गोंदिया : जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयात बोट उलटल्याने दोन तरुण बुडल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इतर सात तरुण पोहून सुरक्षित बाहेर पडले. माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्या बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला. जलाशयात बुडून लापता झालेल्या  तरुणांची ओळख मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे अशी पटली असून, ते दोघेही बारबसपुरा येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यात असलेले बोदलकसा जलाशय हे या भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बरबसपुरा येथील सदर मित्र असलेले अक्षय बिसेन, राकेश लाडे, निखिल पटले, लकी रहांगडाले, प्रलय परधी, मनीष कोकुडे, अविनाश टेकम, मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे हे बोडलकसा जलाशयात सहलीसाठी गेले होते. त्यानंतर ते जलाशयात बोटी बसून आनंद घेत होते. दरम्यान बोट उलटल्याने, त्यातील सर्व तरुण जलाशयात बुडू लागले परंतु सात जण पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मात्र,  दोघे जण अजूनही लापता आहेत त्या तरुणांचा शोध अजूनही सुरू होता.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
आधुनिक केसरी  नांद : हिमायतनगर पोटेड पोटा येथील एका शिक्षक गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी यांच्या कामगार कंटाला गोदावरी...
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!