लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा

लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा

आधुनिक केसरी न्यूज 

सचिन सरतापे 

म्हसवड : माण तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, २४ जून २०२६ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत माण तालुक्यातील परांती गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच पुणे–जेजुरी मार्गावर एका मारुती स्विफ्ट (MH-53-B-0546) कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) याने फिर्यादीशी गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच जेजुरी येथे दोघांचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, योगेश कर्चे (पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नाही) यांच्या मदतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. कोणास ही बाब सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे 64, 64(2)(m), 65(1), 96, 351(2)(3), 3(5) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमन हे करीत असून, संशयित आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज  सचिन सरतापे  म्हसवड : माण तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत...
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ