वेदांत बंडगर खुनातील संशयितांना 'मोक्का' एका अल्पवयीन मुलासह ९ जणांचा समावेश

वेदांत बंडगर खुनातील संशयितांना 'मोक्का' एका अल्पवयीन मुलासह ९ जणांचा समावेश

आधुनिक केसरी न्यूज 

सांगली : शहरातील १४ वर्षीय वेदांत मारुती बंडगर खूनप्रकरणातील संशयित असलेल्या 'एन. जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, टोळीप्रमुख निलेश गडदे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एकूण नऊ संशयितांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. 

निलेश विठोबा गडदे (टोळीप्रमुख, रा. कुपवाड), किरण शंकर लोखंडे, विशाल बिरुदेव चौगुले, सागर ऊर्फ नानासो माणिक चौगुले, अतुल दादासो वायदंडे, संदेश ऊर्फ सँडी रामचंद्र घागरे, एक विधीसंघर्षग्रस्त बालक, मलिक सलीम शेख व कुख्यात गुंड महमंद जमाल नदाफ अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विनयभंग, बेकायदेशीर अंमली पदार्थांची लागवड, घातक शस्त्रे बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दींसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी परिसरातही या टोळीचे जाळे पसरले असल्याचे तपासात समोर आले आहे.

टोळीची वाढती गुन्हेगारी आणि दहशत लक्षात घेऊन मोक्का लागू करण्यासाठी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता श्रीमती ज्योती डाके यांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची छाननी करून अंतिम मंजुरीसाठी तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठविला. शर्मा यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

चौकट : 

उजव्या डोळ्यात गोळी झाडून वेदांतचा खून

संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेदांत बंडगर खूनप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत होते. १४ वर्षीय वेदांतचा उजव्या डोळ्यात गोळी झाडून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. पोलिस तपासादरम्यान निलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडे नगर, कुपवाड) याने आपल्या साथीदारांसह 'एन. जी. ग्रुप' नावाची संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन करून आर्थिक फायद्यासाठी आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेदांतच्या खुनानंतर सांगलीतील राजकारण तापले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संशयितांना मोक्का अंतर्गत कारवाई करू अशी ग्वाही दिली होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत टोलनाक्यावर वाद सोडवणाऱ्या पोलिसावर हल्ला; आठ जण अटकेत
आधुनिक केसरी न्यूज  त्रिसिंग जायभाये   अंबड ग्रामीण : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील भोकर वाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून सुरू असलेला...
कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा