कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
आधुनिक केसरी न्यूज
वरोडा : वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे युवा व तडफदार आमदार करण देवतळे यांनी आपल्या क्षेत्रात विकासात्मक कामाचा धडाका लावला असून आपल्या विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विविध समस्या व विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच विकासात्मक कामांचा भूमिपूजनही ते सातत्याने करत आहेत. आमदार करण देवतळे यांनी वरोडा व भद्रावती येथे खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन व तालुक्यातील वंधली येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता व नालीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.
वरोडा येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा खनिज निधी अंतर्गत तब्बल एक कोटी रुपये खर्चून हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामुळे वरोडा तालुक्यातील युवक युवतींना हँड्स आॅन ट्रेनिंग आणि रोजगार, स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार असून हा प्रकल्प स्थानिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
या कौशल्य विकास प्रशासन केंद्रातून युवक व युवतींना विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधीचा चालना मिळणार आहे. त्यामुळे वरोडा व भद्रावती परिसरातील युवकांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करत सर्वांगीण विकासासोबतच युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असा विश्वास यावेळी करण देवतळे यांनी व्यक्त केला. वरोडा येथील कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समितीचे उपविभागीय अभियंता मोहन खराटे व सहाय्यक अभियंता चंद्रशेखर गायकवाड भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे कृषी उत्तम बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे, शहर भाजपाध्यक्ष संतोष पवार,राजीव दोडके, नगरसेवक अक्षय भिवदरे, शंभुनाथ वरघणे,राहुल, अनिकेत नाकाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वंधली येथील प्रस्तावित सिमेंट काँक्रेट रस्ता व नालीच्या बांधकामाचे भूमिपूजनही आमदार करण देवतळे यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. वंधली येथील कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे, संचालक बाळासाहेब भोयर, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कवडूजी पिसाळकर, मधुकर चौधरी, उपसरपंच अनिल ठावरी, ग्रामपंचायत सदस्य सागर भोयर, सारंग चरडे, गोपाळ येडमे, बाबाराव वाघमारे,निलेश धोटे, ग्रामसेविका राजपूत ताई, शेखर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List