डोळ्यांना दृष्टी मातीत हिरवाई रस्त्यावर शिस्त अन् हातात बचतीची शिदोरी..!

राजाभाऊ देशमुखांच्या वाढदिवसाला समाजकारणाचा नवा चेहरा; विविध सामाजिक उपक्रमांनी भोकरदनमध्ये वेधले लक्ष

डोळ्यांना दृष्टी मातीत हिरवाई रस्त्यावर शिस्त अन् हातात बचतीची शिदोरी..!

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे 

भोकरदन : वाढदिवस म्हटला की हार-तुरे,सत्कार, शुभेच्छांचा वर्षाव आणि जल्लोष..पण भोकरदनचे माजी नगराध्यक्ष तथा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत वाढदिवसाचा प्रत्येक क्षण समाजाच्या कामासाठी खर्च केला. मोतीबिंदू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया,नागरिकांना वृक्षवाटप,स्वच्छता मोहीम, वाहतूक नियमांची जनजागृती आणि विद्यार्थ्यांना पिगी बँकचे वाटप अशा विविध उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस अक्षरशःसमाजकारणाचा उत्सव ठरला.माझा वाढदिवस नाही... समाजाचा दिवस अशीच या उपक्रमांची भावना होती.आरोग्यापासून पर्यावरणापर्यंत,स्वच्छतेपासून वाहतूक शिस्तीपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक संस्कारापासून सामाजिक बांधिलकीपर्यंत अनेक प्रश्नांना एका दिवसात हात घालण्यात आला.

गरजूंच्या डोळ्यांत प्रकाश,वाढदिवसाची खरी भेट

आर्थिक अडचणींमुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुढे ढकलणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या बदल्यात गरजूंच्या आयुष्यात आरोग्याची नवी आशा निर्माण करण्याचा हा प्रयत्न ठरला.

महाआरतीनंतर हातात रोप,श्रद्धेला पर्यावरणाची जोड

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात महाआरती करण्यात आली. मात्र आरतीनंतर केवळ प्रसाद घेऊन घरी परतण्याऐवजी नागरिकांच्या हातात वृक्षांची रोपे देण्यात आली. ‘एक व्यक्ती–एक वृक्ष आणि त्याचे संगोपन’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


शिवरायांच्या चौकातून ‘हेल्मेट’चा हुंकार

छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री गणपती परिवाराच्या वतीने वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात आले.विद्यार्थी आणि युवकांनी नागरिकांना हेल्मेट वापरणे,वाहतूक नियम पाळणे,वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे याबाबत प्रबोधन केले. रस्त्यावरची एक छोटी चूक एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते;त्यामुळे वाहतूक शिस्त ही केवळ पोलिसांची नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे,असा प्रभावी संदेश या अभियानातून देण्यात आला.

बसस्थानक परिसरात हातात झाडू,अन् रोपही

भोकरदन बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्षलागवड करण्यात आली.सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपरिषद किंवा प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव करून देण्यात आली.स्वच्छ भोकरदन हरित भोकरदन’ असा संकल्प यावेळी करण्यात आला

विद्यार्थ्यांच्या हातात पिगी बँक;उद्याच्या भविष्याची आजपासून तयारी

वाढदिवसाच्या निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत पिगी बँकचे वाटप करण्यात आले.लहान वयात बचतीची सवय लागावी, पैशाचे महत्त्व समजावे आणि आर्थिक शिस्तीचा संस्कार व्हावा, हा त्यामागील उद्देश.आजची छोटी बचत उद्याच्या मोठ्या स्वप्नांना बळ देऊ शकते, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डोळ्यांना दृष्टी मातीत हिरवाई रस्त्यावर शिस्त अन् हातात बचतीची शिदोरी..! डोळ्यांना दृष्टी मातीत हिरवाई रस्त्यावर शिस्त अन् हातात बचतीची शिदोरी..!
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे  भोकरदन : वाढदिवस म्हटला की हार-तुरे,सत्कार, शुभेच्छांचा वर्षाव आणि जल्लोष..पण भोकरदनचे माजी नगराध्यक्ष तथा जालना...
धावड्यात जुगाराचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण ताब्यात, चौघे फरार; ₹१.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चौथीत पाहिलं डॉक्टर होण्याचं स्वप्न... आज स्वतःचं रुग्णालय उभं केलं..
स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..!
अल्प मानधनावर पोषण आहार योजनेचा डिजिटल कारभार; कायम सेवेसाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स आक्रमक...
मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?
राष्ट्रध्वजाला विरोध करणाऱ्यांकडून ‘तिरंगा यात्रा’ काढली जात असेल तर स्वागतार्हच, ‘देर आये दुरुस्त आये’: हर्षवर्धन सपकाळ