लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू 

लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू 

आधुनिक केसरी न्यूज 

लोहा :  शहरातील नांदेड रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील पेट्रोल पंपासमोर नांदेडकडे जाणाऱ्या दुधाने भरलेल्या टँकरच्या मागील चाकाखाली येऊन एकोणसत्तर वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ११ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी टँकर चालकासह ताब्यात घेतला. 

लोहा शहरातील सायाळ रोड भागातील रहिवाशी भागीरथाबाई रामदास पुदिंगे (वय ६९) ही वृद्ध महिला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घरून निघून नांदेड रस्त्याने पायी जात असताना शासकीय विश्रामगृहासमोरील पेट्रोल पंपासमोर लोह्याकडून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाने भरलेला टँकर क्र. टीएस ०८ यूएल ०१७१ च्या पाठीमागील चाकाखाली भागीरथाबाई आल्याने चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराच्या खालील भाग चेंदामेंदा झाल्याने रस्त्यावर रक्त मासाचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर चालकासह ताब्यात घेतला. सदर मयत वृद्ध महिला ही सकाळच्या समयी फुले व दूध आणण्यासाठी गेली असल्याचे त्यांच्या नातेवाईकातून सांगण्यात आले. याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..! स्मृतींना उजाळा...अन् मातीला हिरवाईची सलामी..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन  : एका थोर व्यक्तीच्या स्मृती केवळ छायाचित्राला हार घालून जपायच्या नसतात... त्या विचारांना कृतीची जोड देऊन...
अल्प मानधनावर पोषण आहार योजनेचा डिजिटल कारभार; कायम सेवेसाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स आक्रमक...
मजुराच्या रक्ताने विचारला प्रश्न ‘परवानगी’ची सही कुठे आहे?
राष्ट्रध्वजाला विरोध करणाऱ्यांकडून ‘तिरंगा यात्रा’ काढली जात असेल तर स्वागतार्हच, ‘देर आये दुरुस्त आये’: हर्षवर्धन सपकाळ
लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू 
हाणेगाव आश्रमशाळेत चिकन भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; तहसीलदार आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव.
भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले