वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

आधुनिक केसरी न्यूज 

 फकिरचंद पाटील 

पाचोरा : संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधीने जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, याचे उत्तम उदाहरण पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर (आप्पा) पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. डोक्यात गंभीर गाठ असलेल्या एका चिमुरडीच्या उपचारासाठी त्यांनी वेळेत केलेल्या हस्तक्षेपामुळे तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन तिला नवजीवन मिळाले. काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या लहान मुलीच्या गंभीर आरोग्य समस्येसंदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे मदतीसाठी आली होती. मुलीच्या डोक्यात गाठ असल्याने तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार पाटील यांनी तातडीने संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला आणि मुलीला पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करून आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी समन्वय साधला.

डॉ .पवनसिंग यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वेळेत उपचार मिळाल्याने चिमुरडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन तिची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. चिमुरडीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील समाधान पाहून उपस्थितांनाही भावूक क्षण अनुभवायला मिळाला. गरजू नागरिकांच्या अडचणींमध्ये तत्परतेने मदतीचा हात देत केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून दिलासा देण्याची आमदार किशोर आप्पा पाटील यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संकटसमयी जनतेसाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
आधुनिक केसरी न्यूज   फकिरचंद पाटील  पाचोरा : संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधीने जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, याचे उत्तम उदाहरण पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे...
ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!
अतिवृष्टीनंतर तूर पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी तातडीने घ्यावीत प्रतिबंधात्मक उपाययोजना
दारूच्या विळख्यात अडकलेली तरुणाई; उद्याची पिढी धोक्याच्या उंबरठ्यावर
देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथील मण्याड नदीच्या वळणावर अपघाताचे सावट; झाडे-झुडपांमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात!
हिमायतनगर खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाचा निकाल..!
देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी