कचरा डेपो हटवा, अन्यथा मनपासमोर आंदोलन सांगली

आधुनिक केसरी न्यूज 

सांगली : मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वार्ड क्र. ९ मधील आनंद पार्क व गणलक्ष्मी पार्क परिसरातील कचरा कंटेनर व कचरा डेपो तात्काळ अन्यत्र स्थलांतरित करावा, अन्यथा सहा दिवसांत महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रभाग समिती क्र. ३ मधील विविध वार्डांचा कचरा या ठिकाणी जमा केला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी, मच्छर, माशा व भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हा डेपो तात्काळ हटवून येथे केवळ घंटागाडीमार्फत नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या सहा दिवसांत कचरा डेपो हटविण्यात आला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (महापालिका मुख्यालय) येथे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थायी समिती सभापती अतुल माने,  नगरसेवक संतोष पाटील,  नगरसेविका रोहिणी पाटील, नगरसेविका वर्षा सरगर यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण
आधुनिक केसरी न्यूज  सांगली : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा,...
कचरा डेपो हटवा, अन्यथा मनपासमोर आंदोलन सांगली
पाचोरा–भडगाव परिसरात पावसाची संततधार; कापूस, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर पिकांना फटका बसण्याची भीती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा  महाविद्यालय अजूनही सुरूच 
वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावी हजारो भाविक  भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन
बनावट देयके अन् थेट खात्यात लाखो रुपये; देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील महाघोटाळा उघडकीस