भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!

आधुनिक केसरी न्यूज 

गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरनी लूट करून फरार होण्यापूर्वी व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हद्दीतील सूर्याटोला येथील बांध तलावाच्या परिसरात नेहमीप्रमाणे आज २३ जुलै गुरुवारी सकाळी 7 वाजता प्रदीप अपाले वय 68 वर्ष हे मॉर्निंग वॉक करून घरी परत होते. याच वेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने प्रदीप अपाले यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोन वार केले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप अपाले यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.

नागरिकांमध्ये भीती
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसाठी बांध तलाव परिसर सुरक्षित समजला जातो. मात्र भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!