ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!

ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : दि. ४ ऑगस्ट  ये 'गुंगी गुडिया नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय.. हर्षवर्धन सपकाळ माफी मागा... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन येथील कॉंग्रेस कार्यालयात घुसून हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध केला.

जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज दुपारी २ वाजता तन्ना हाऊस येथील गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आणि दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात जाऊन हे आंदोलन करण्यात आले. 

कॉंग्रेसच्या एक्स पेजवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर ट्वीट करण्यात आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून हा जाहीर निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, दक्षिण मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पूजा पवार, पांडुरंग रोडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..! ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. ४ ऑगस्ट  ये 'गुंगी गुडिया नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय.. हर्षवर्धन...
अतिवृष्टीनंतर तूर पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी तातडीने घ्यावीत प्रतिबंधात्मक उपाययोजना
दारूच्या विळख्यात अडकलेली तरुणाई; उद्याची पिढी धोक्याच्या उंबरठ्यावर
देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथील मण्याड नदीच्या वळणावर अपघाताचे सावट; झाडे-झुडपांमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात!
हिमायतनगर खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाचा निकाल..!
देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण