हिमायतनगर खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाचा निकाल..!

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर : मागील पाच वर्षांपूर्वी हिमायतनगर येथे प्रवाशी भरण्याच्या क्षूल्लक कारणावरून धारधार शस्त्राने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाला.या प्रकरणी शूकवारी ( ता. ३१)येथील अतिरिक्त जिल्हा सरन्यायाधीश महंमद नासीर महंमद सलीम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असुन तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील ५ जानेवारी २०२२ रोजी दूपारी १२.३० वाजताच्या सुमारास हिमायतनगर येथील घारापुर फाटा, मध्यवर्ती बँके जवळ गाडीत प्रवाशी भरण्याच्या क्षूल्लक कारणावरून गुरू महाराज शिवदास स्वामी( रा.हिमायतनगर वय ३१) व  शेख इम्रान शेख जलील(वय२७ रा.रहिम काॅलणी , हिमायतनगर) याच्यात वाद झाला.यावेळी आरोपी गुरू महाराज  स्वामी यांनी साथीदारांच्या मदतीने शेख इम्रान शेख जलील यांच्यावर धारधार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. मयताचा भाऊ शेख सलिम शेख जलील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.जी.महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन साक्षीदाराचे जबाब, वैद्यकीय पूरावे, न्यायवैद्यक अहवाल, शस्त्र जप्ती,कपडे असे भक्कम पूरावे न्यायालयात सादर केले.शूक्रवारी (ता.३१) सदर प्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ.अनुराधा डावखोरे  यांनी प्रभावी युक्तिवाद करून सक्षम पुरावे सादर केले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक नईम खान, पोलिस कर्मचारी रमेश आडे यांनी मोलाचे सहकार्य केले. अतिरिक्त जिल्हा सरन्यायाधीश महंमद नासीर महंमद सलीम यांनी साक्षी पुरावे तपासून अरोपी गुरू महाराज शिवदास स्वामी यांना जन्म ठेपेची शिक्षा व  एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. ईतर आरोपी राहुल कारमोड, विलास डांगे,भास्कर वानखेडे यांची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्तता केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिमायतनगर खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाचा निकाल..! हिमायतनगर खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाचा निकाल..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : मागील पाच वर्षांपूर्वी हिमायतनगर येथे प्रवाशी भरण्याच्या क्षूल्लक कारणावरून धारधार शस्त्राने हल्ला केल्याने एकाचा मृत्यू...
देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण
कचरा डेपो हटवा, अन्यथा मनपासमोर आंदोलन सांगली
पाचोरा–भडगाव परिसरात पावसाची संततधार; कापूस, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर पिकांना फटका बसण्याची भीती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा  महाविद्यालय अजूनही सुरूच 
वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू