देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

आधुनिक केसरी न्यूज 

देगलूर माणिक सुर्यवंशी

नांदेड : देगलूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वझरगा ता. देगलूर शिवारात दुचाकी आणि भरधाव आयशर ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज ३१ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी शिवानंद केशवराव इंगळे (वय २७) आणि सदानंद बालाजी भुरे (वय १९) हे दोघे आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH 26 CT 9222 देगलूरकडून आदमपूरच्या दिशेने जात होते. दुपारी २:३० वाजेच्या सुमारास देगलूर तालुक्यातील वझरगा शिवारात आले असता, समोरून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (क्रमांक: NL 07 AA 2437 त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचालक शिवानंद इंगळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला सदानंद भुरे हा गंभीर जखमी झाला.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून तत्परता

अपघाताची माहिती मिळताच DySP किरण पोपलघाट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता जखमी सदानंद भुरे याला स्वत:च्या वाहनातून देगलूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल 

घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे, बीट जमादार अशोक घुमे, ज्ञानोबा केंद्रे, बळीराम घुले, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डीडेवार व नामपल्ले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देगलूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आदमपूर व देगलूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी देगलूर-नांदेड महामार्गावर वझरगा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
आधुनिक केसरी न्यूज  देगलूर माणिक सुर्यवंशी नांदेड : देगलूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वझरगा ता. देगलूर शिवारात दुचाकी आणि भरधाव...
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची NSUIची मागणी; सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण
कचरा डेपो हटवा, अन्यथा मनपासमोर आंदोलन सांगली
पाचोरा–भडगाव परिसरात पावसाची संततधार; कापूस, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर पिकांना फटका बसण्याची भीती
जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाच्या पत्राला केराची टोपली अनेक शाळा  महाविद्यालय अजूनही सुरूच 
वाघलवाडा येथे नविन साखर खाण्यावर बाल कामगाराचा  खांबावरून पडून जागीच मृत्यू
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावी हजारो भाविक  भक्तांनी घेतले श्रींचे दर्शन