क्रेटा थेट खोल विहिरीत; १२–१३ तास मृत्यूशी झुंज; स्कुबा डायव्हर्सने कार बाहेर काढली, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : एका क्षणात दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न... आणि पुढच्याच क्षणी क्रेटा कार खोल विहिरीत.. पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेने परिसर हादरला.रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळलेली क्रेटा कार तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक बचावकार्यानंतर अखेर बाहेर काढण्यात आली. मात्र,या बचावकार्याचा शेवट दोन महिलांच्या मृत्यूच्या काळजाला चटका लावणाऱ्या बातमीने झाला.या दुर्घटनेत अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा कारमध्येच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी सुलताना बी. बेगम यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.
धडक कारला वाचविण्याचा प्रयत्न अन् थेट विहिरीत.
मिळालेल्या माहितीनुसार,भरधाव दुचाकीस्वाराने क्रेटा कारला धडक दिली आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला.दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, त्याचवेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार क्षणार्धात रस्त्यालगतच्या खोल विहिरीत जाऊन कोसळली.
अंधार, खोल पाणी अन् विहिरीत अडकलेली कार..
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीचा काळोख, विहिरीतील मोठ्या प्रमाणातील पाणी आणि उपलब्ध बचावसाहित्याची मर्यादा यामुळे कारपर्यंत पोहोचणेच मोठे आव्हान ठरले.कार विहिरीत नेमकी कुठे अडकली आहे, याचा शोध घेणेही कठीण जात होते. स्थानिक नागरिकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवले.
१२–१३ तासांची झुंज; अखेर स्कुबा डायव्हर्स पाण्यात उतरले..
बचावकार्याला वेग देण्यासाठी अखेर स्कुबा डायव्हर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पाण्यात उतरून कारचा ठाव घेण्यात आला.त्यानंतर कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.तासन्तास चाललेल्या या थरारक बचावकार्यानंतर अखेर १२ ते १३ तासांनी क्रेटा कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले.कार बाहेर आल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, गंभीर जखमी सुलताना बी. बेगम यांना बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
प्रशासन-पोलीस आणि नागरिकांची रात्रभर धावपळ..
पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू,उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने तसेच तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले. पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक आणि स्कुबा डायव्हर्सच्या पथकाने कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
‘बचावयंत्रणा’ कुठे? विलंबावर नागरिकांचा संताप
दरम्यान, अत्याधुनिक बचाव साधने आणि प्रशिक्षित पथक वेळेत उपलब्ध झाले असते तर बचावकार्य आणखी जलद होऊ शकले असते, अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी अशा दुर्घटनेत तातडीने वापरता येईल अशी. वाचविण्याच्या प्रयत्नात कार विहिरीत कोसळली; रात्रभर सुरू राहिलेली मदतीची धडपड, १२–१३ तासांची प्रतीक्षा आणि अखेर दोन जीवांचा अंत... पारध–पद्मावती मार्गावरील ही दुर्घटना परिसराच्या .काळजात कायमची
जखम करून गेली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List