पक्ष वाढवा;अन्याय होऊ देणार नाही..!
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा भोकरदनच्या शिवसैनिकांना शब्द; संघटन मजबूत करण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : पक्ष संघटना बळकट करा,पक्ष तुमच्या कार्याची निश्चित दखल घेईल. यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही.असा खणखणीत शब्द राज्यमंत्री तथा जालना जिल्हा पक्ष निरीक्षक आशिष जयस्वाल यांनी भोकरदन येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.६ ऑगस्ट रोजी रत्नमाला लॉन्स येथे मतदार यादी पुनरावलोकन व SIR आढावा बैठक तसेच शिवसेना संघटनात्मक मेळावा पार पडला.यावेळी जयस्वाल म्हणाले की, ज्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नाही, तेथील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवून पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले जाईल.पक्षाच्या कामात जो सक्रिय राहील, त्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू. तुम्ही संघटना वाढवा, पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी भोकरदन शहरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO शिक्षक-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके, भूषण शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List