सांगलीत ‘पिस्तूल रॅकेट’चा पर्दाफाश! सेंधव्यातून आली पिस्तुलांची खेप

सांगलीत ‘पिस्तूल रॅकेट’चा पर्दाफाश! सेंधव्यातून आली पिस्तुलांची खेप

आधुनिक केसरी न्यूज 

सांगली : जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी फाटा, खरसुंडी आणि आटपाडी परिसरात राबविलेल्या कारवाईत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ११ देशी बनावटीचे पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे आणि दोन स्पेअर मॅगझीन असा एकूण ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत मयुरेश मनोहर आदाटे (२५, रा. विटा, सध्या चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले (२४, रा. जांभूळमळा, ता. खानापूर) आणि वैभव ऊर्फ गब्बर संजय इंगळे (२१, रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर, सध्या चाकण, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मध्यप्रदेशातील सेंधवा येथील ‘पाजी’ नामक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश आदाटे हा आटपाडी-भिवघाट मार्गावरील नेलकरंजी फाटा येथे कमरेला पिस्तूल खोचून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

चौकशीदरम्यान मयुरेशने हे पिस्तूल मारुती गुजले याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी खरसुंडी येथील लाजरी पापड परिसरात कारवाई करून मारुती गुजलेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मारुती गुजले याने ही शस्त्रे वैभव ऊर्फ गब्बर इंगळे याच्याकडून घेतल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आटपाडी येथील स्वादिष्ट मच्छीफ्राय सेंटरजवळ वैभव इंगळे आढळून आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील काळ्या रंगाच्या सॅकमधून सात पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे आणि दोन स्पेअर मॅगझीन जप्त करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत वैभव इंगळे याने ही सर्व ११ पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझीन मध्यप्रदेशातील सेंधवा येथील ‘पाजी’ नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा या व्यक्तीशी संपर्क असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. 

जप्त केलेल्या शस्त्रांसाठी आरोपींकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात आढळून आले. याप्रकरणी पोलिस हवालदार हणमंत लोहार यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय शस्त्र अधिनियम तसेच मनाई आदेशाच्या उल्लंघनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.

पोलिसांच्या माहितीनुसार, वैभव हा सेंधवा येथे जाऊन संबंधित व्यक्तीकडून शस्त्रे घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे अवैध शस्त्रांची मोठी साखळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ही विशेष मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सांगलीत ‘पिस्तूल रॅकेट’चा पर्दाफाश! सेंधव्यातून आली पिस्तुलांची खेप सांगलीत ‘पिस्तूल रॅकेट’चा पर्दाफाश! सेंधव्यातून आली पिस्तुलांची खेप
आधुनिक केसरी न्यूज  सांगली : जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली....
वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य!
एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ
अत्याचार, जबरी चोरी  प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराविरोधात युवक काँग्रेसचे वांद्रे आणि बोरीवलीत बॅनर फडकावून आंदोलन
वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!