एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ

एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ

आधुनिक केसरी न्यूज 

देगलूर  माणिक सुर्यवंशी

देगलूर : शहरासाठी सुमारे एका महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पाच नवीन इलेक्ट्रिक बसपैकी एका बसवर ट्रॅक्टर लावून ओढत नेण्याची वेळ आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अत्याधुनिक सुविधा आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या इलेक्ट्रिक बस देगलूर शहरात दाखल झाल्या होत्या. मात्र, एवढ्या कमी कालावधीत बसमध्ये बिघाड झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती ओढून न्यावी लागल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून बसच्या दर्जाबाबत तसेच देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी नेमका बिघाड काय झाला आणि बस ट्रॅक्टरने का ओढावी लागली, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच्या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ
आधुनिक केसरी न्यूज  देगलूर  माणिक सुर्यवंशी देगलूर : शहरासाठी सुमारे एका महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पाच नवीन इलेक्ट्रिक बसपैकी एका बसवर...
अत्याचार, जबरी चोरी  प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराविरोधात युवक काँग्रेसचे वांद्रे आणि बोरीवलीत बॅनर फडकावून आंदोलन
वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!
अतिवृष्टीनंतर तूर पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी तातडीने घ्यावीत प्रतिबंधात्मक उपाययोजना
दारूच्या विळख्यात अडकलेली तरुणाई; उद्याची पिढी धोक्याच्या उंबरठ्यावर