वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य!

वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य!

आधुनिक केसरी न्यूज 

माणिक सुर्यवंशी 

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील 'पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२' प्रशासकीय दुर्लक्ष आणि अनास्थेमुळे स्वतःच 'आयसीयू'मध्ये गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या गुराढोरांवर उपचारासाठी असलेल्या या शासकीय दवाखान्याची प्रचंड पडझड झाली असून संपूर्ण परिसर घाणीच्या व चिखलाच्या विळख्यात सापडला आहे. गाजर गवत अन् डबक्यांचे साम्राज्य
दवाखान्याच्या इमारतीकडे पाहिल्यास हा दवाखाना सुरू आहे की बेवारस पडून आहे, असा प्रश्न पडतो. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गाजर गवत व अनावश्यक झाडेझुडपे वाढली आहेत. जनावरांवर उपचारादरम्यान त्यांना स्थिर उभे करण्यासाठी बांधण्यात येणारे लोखंडी ट्रॅप (क्रेट्स) थेट साचलेल्या पाण्याच्या डबक्यात आणि चिखलात रुतले आहेत. यामुळे आजारी जनावरांना उपचारासाठी येथे आणणे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे झाले आहे. इमारतीची दुरवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न जीर्ण इमारत: दवाखान्याची इमारत जुनी झाली असून भिंतींचे प्लास्टर उखडले आहे.पावसाळ्यात अस्वच्छता: योग्य निचरा नसल्याने पावसाचे पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

 शेतकऱ्यांची परवड: उपचारासाठी सुविधा नसल्याने किंवा अवस्था बिकट असल्याने शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा महागडा आसरा घ्यावा लागत आहे. "देगलूर तालुक्यातील वन्नाळी व परिसरातील शेतकऱ्यांचे मूळ उत्पन्न शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. परंतु पावसाळ्यात जनावरांना आजारपण आल्यास या दवाखान्यात उपचारासाठी आणणे कठीण झाले आहे. चिखलात उभे राहून जनावरांवर उपचार कसे करायचे?"  संपूर्ण शेतकरी  बांधव वझरगा वन्नाळी तुपशेळगाव 

तातडीने दुरुस्तीची मागणी
ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वन्नाळी (ता. देगलूर) येथील या पशुवैद्यकीय दवाखान्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, परिसराची स्वच्छता करून चिखल व गवताचा निचरा करावा आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य! वन्नाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बिकट; गाजर गवत, चिखल अन् समस्यांचे साम्राज्य!
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी  नांदेड : जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील 'पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२' प्रशासकीय दुर्लक्ष आणि अनास्थेमुळे स्वतःच...
एका महिन्यांपूर्वी आलेल्या नव्या ई-बसची दुर्दशा; ट्रॅक्टरला बांधून डेपोकडे नेण्याची वेळ
अत्याचार, जबरी चोरी  प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराविरोधात युवक काँग्रेसचे वांद्रे आणि बोरीवलीत बॅनर फडकावून आंदोलन
वेळीच मदतीचा हात; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
ये 'गुंगी गुडिया' नही ये 'आंधी' है... हर्षवर्धन सपकाळ हाय हाय...राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक ;कॉंग्रेसच्या कार्यालयात घुसून केला तीव्र निषेध..!
अतिवृष्टीनंतर तूर पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी तातडीने घ्यावीत प्रतिबंधात्मक उपाययोजना