माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान

माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान

आधुनिक केसरी न्यूज 

त्रिसिंग जायभाये 

अंकुशनगर : पुणे येथे ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ (DSTA) तर्फे साखर उद्योग, तंत्रज्ञान आणि औद्योगिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साखर उद्योगाच्या माध्यमातून मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साखर उद्योगात अभ्यासपूर्ण नेतृत्व करत कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहिल्याबद्दल राजेश टोपे यांचा हा सन्मान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, खाते-विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक कंत्राटदार, मजूर व हितचिंतकांनी राजेश टोपे यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे  भोकरदन : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्याचा ठेका आणि हातात फडकणारे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात...
राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या शेजारी बिअर बार अन् देशी दारूचे दुकान; पिढी घडविणाऱ्या परिसराचे नियोजन नेमके कोणाचे
जांभुळणीच्या डोंगरातील झाडीत अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले
आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!
केक नाही; १६२ विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली..!