नळणी खुर्दच्या विकासाला ‘दानवे’ बूस्टर..!

गावात एकाच वेळी अनेक विकासकामांचा शुभारंभ; निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार संतोष दानवे यांचे आश्वासन

नळणी खुर्दच्या विकासाला ‘दानवे’ बूस्टर..!

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे

 भोकरदन : गावाच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही,विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,अशी ग्वाही आमदार संतोष  दानवे यांनी नळणी खुर्द येथे दिली. ग्रामपंचायत कार्यालय व महिला बचत भवन,चौफुली ते जुने गाव सिमेंट रस्ता, पंचवीस-पंधरा योजनेअंतर्गत सभागृह तसेच समर्थ काळू महाराज देवस्थान परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार दानवे यांनी गावोगावी मूलभूत सुविधा मजबूत करण्याला आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. रस्ते,सभागृह,ग्रामपंचायत कार्यालय, महिला बचत भवन यांसारख्या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 चौकट

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सुरू; उर्वरितांनाही लवकरच दिलासा’

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही आमदार दानवे यांनी महत्त्वाचे भाष्य केले. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली असून,उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच त्याचा लाभ मिळेल,असे त्यांनी सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे आणि गजानन वराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान देठे सर यांनी केले, तर आभार रामेश्वर देठे यांनी मानले.यावेळी कमलाकर साबळे, मधुकर तांबडे, कृष्णा ठोंबरे, पप्पू ठोंबरे, रमेश वराडे, समर्थ काळू महाराज संस्थानचे सुदाम वराडे, पुरुषोत्तम वराडे, श्रीराम चोरमारे, गणेश देठे, विजय गिरणारे, विजय वराडे, गुलाब वराडे, कल्याण साबळे, अवचित देठे, संजीव वराडे, बालू वराडे, संतोष वराडे, विष्णू वराडे, रामेश्वर वराडे, रामकिसन देठे, दिलीप वराडे, श्रीराम देठे तसेच ग्रामसेवक दानवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.विकासकामांच्या भूमिपूजनामुळे नळणी खुर्दच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News