आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!

४० वाहनचालकांवर कारवाई; ₹४५ हजारांचा दंड वसूल, मोबाईल चोरीची एकही तक्रार नाही

आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे

भोकरदन : गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांवर नजर आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई करत भोकरदनच्या शनिवारीच्या आठवडी बाजारात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे मोबाईल चोरीची एकही तक्रार दाखल झाली नाही.त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. याची दखल घेत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या पथकाने बाजार परिसरात कडक बंदोबस्त ठेवत गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त घातली.दरम्यान, वाहतूक नियमभंग करणाऱ्या ४० वाहनचालकांवर कारवाई करून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात ट्रिपल सीट ८, विनाहेल्मेट १२, नो-पार्किंग १२, मोबाईलवर बोलणे ५, अवैध प्रवासी वाहतूक १, तुटलेली नंबर प्लेट १ आणि लायसन्स नसलेले १ प्रकरणाचा समावेश आहे.

पोलिसांच्या धडक कारवाईमुळे बाजारातील वाहतूक सुरळीत राहिली आणि ‘गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांची खैर नाही’ असा स्पष्ट संदेश चोरट्यांना मिळाला.नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी मोबाईल,पाकीट व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी,तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News