भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे 

भोकरदन : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्याचा ठेका आणि हातात फडकणारे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी (९ ऑगस्ट) भोकरदन शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने अवघे भोकरदन आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेले. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रेरणेने आणि आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली साजित तडवी यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मिरवणुकीत समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.ढोल-ताशांच्या निनादासह आदिवासी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीमुळे शहरातील वातावरणात उत्साह संचारला.मिरवणुकीनंतर सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती मेळावा घेण्यात आला.यावेळी आदिवासी समाजाचे हक्क, शिक्षण, परंपरा आणि सामाजिक प्रगती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आपल्या संस्कृतीचे जतन करत शिक्षण आणि विकासाच्या प्रवाहात पुढे जाण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाला आमदार संतोष दानवे यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उत्साह आला.यावेळी तडवी परिवार आणि समाजबांधवांच्या वतीने आमदार दानवे यांचा आभार व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर घनवट सर यांनी केले. सलीम तडवी सर यांनी आभार मानले, तर सचिन तडवी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.यावेळी नगरसेवक, रामदास पाथरे, नानासाहेब वानखेडे, माजी सरपंच राजेश राजपूत, अली बाबा तडवी, हुसेन तडवी, अमित तडवी, अमोल हिंगे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे  भोकरदन : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्याचा ठेका आणि हातात फडकणारे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात...
राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या शेजारी बिअर बार अन् देशी दारूचे दुकान; पिढी घडविणाऱ्या परिसराचे नियोजन नेमके कोणाचे
जांभुळणीच्या डोंगरातील झाडीत अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले
आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!
केक नाही; १६२ विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली..!