श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले

आधुनिक केसरी न्यूज 

हनुमंत मस्तुद

माढा : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था तसेच घाटावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांचा सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुंटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले
आधुनिक केसरी न्यूज   अमोल शिंदे  भोकरदन : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्याचा ठेका आणि हातात फडकणारे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात...
राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या शेजारी बिअर बार अन् देशी दारूचे दुकान; पिढी घडविणाऱ्या परिसराचे नियोजन नेमके कोणाचे
जांभुळणीच्या डोंगरातील झाडीत अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले
आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!
केक नाही; १६२ विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली..!