दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!

दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!

आधुनिक केसरी न्यूज 
 
जळगाव जा : दि.१७ घरफोडी, दुकानफोडी , विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप चोरी, मोटर सायकल चोरीचे प्रकार कधी नव्हे एवढे वाढले असून गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिसांचे कर्तव्य शून्य आहे. पोलीस स्टेशन न्यायालय उपविभागीय अधिकारी कार्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेले शहरातील मध्यवर्ती परिसरातील राजा भर्तृहरीनाथ मंदिरालगत  असलेल्या दुर्गामाता मंदिरातील दुर्गा देवीच्या डोक्यावरील अंदाजे ९००ते१००० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सदर चांदीच्या मुकुटाची किंमत आजच्या भावाने दोन लाख रुपया पेक्षा अधिक आहे. 

या प्रकरणी अंबादास श्यामराव भाकरे यांचे फिर्यादीवरून  पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ह्या मंदिरात अंबादास श्यामराव भाकरे हे नियमितपणे पूजा-अर्चना व देवीची आरती करण्यासाठी जातात. मंदिरातील पूजा-अर्चना करण्यासाठी प्रकाश देशपांडे महाराज हे देखील मंदिराची देखभाल करतात.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता अंबादास भाकरे हे दुर्गामाता मंदिरात गेले असता देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व्यवस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजता रोहित गजानन कल्याणकर यांनी फोन करून मंदिरातील देवीच्या अंगावरील फुलांचे हार उचकटलेले असून देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट दिसत नसल्याची माहिती दिली. यानंतर अंबादास भाकरे यांनी रोहित गजानन कल्याणकर तसेच अजय गजानन गवडे यांच्यासमवेत मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागात मुकुटाचा शोध घेतला. मात्र मुकुट मिळून आला नाही. सदर चांदीचा मुकुट अंदाजे १५ ते २० वर्षे जुना असून त्याचे वजन सुमारे ९००ते१००० ग्रॅम असून आजच्या बाजारभावाने त्याची किंमत २,१६०००/_आहे. 

सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरातून चांदीचा मुकुट चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय वेरुळकर करीत आहेत.

पोलिसांचा खोडसाळपना: संबंधितांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पंधरा ते वर्ष जुना असून त्याचे वजन ९०० ग्रॅम दाखवण्यात आले आहे. आजचे चांदीचे भाव हे २,४०,०००_ (दोन लाख चाळीस हजार रुपये प्रतिकिलो) प्रति किलो असून पोलिसांनी त्या मुगुटाची किंमत गुन्हा दाखल करताना केवळ ४८००/_ रुपये एवढी कमी दाखवली. हा पोलिसांचा लोगो खोळसाडपणा असल्याची चर्चा आहे.

आज मंदिर परिसरातील यात्रा:नागपंचमीदिनी १७ ऑगस्ट रोजी लगतच्या राजा मृतहरीनाथ मंदिरात मोठी यात्रा भरते. सर्व भाविक राजा भर्तरीनाथ मंदिरासह दुर्गा माता मंदिरात दर्शना येतात. त्यामुळे हजारो भाविकांमध्ये दुर्गा मातेच्या मुगूटाच्या चोरीचीच संपूर्ण दिवसभर चर्चा होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान  आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान 
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांनी आता एका मूक प्राण्यालाही जीवनदान दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील...
दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!
श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!
देशातील हवा बदलली, भाजपाकडे मुद्दाच नाही म्हणून वंदे मातरम वरून हिंदू-मुस्लीम करण्याचा अघोरी डाव, पण ‘मोहब्बत की दुकान’ हाच काँग्रेसचा मार्ग : हर्षवर्धन सपकाळ
शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या               
बाल कीर्तनकाराच्या दमदार निरूपणाने हरिनाम सप्ताहाचा पहिल्याच दिवशी भक्तीचा तुफान रंग
ग्रामीण भागातही जाणवत आहे झाडांची कमतरता; बच्चेकंपनीने गॅलरीत झोके बांधून लुटला नागपंचमीचा आनंद