स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शरदचंद्र पवार महाविद्यालयात वृक्षारोपण;विद्यार्थ्यांचा ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा निर्धार
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह,तिरंग्याचा अभिमान आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प या त्रिसूत्रीचा संगम भोकरदन येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात पाहायला मिळाला.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवारी (दि. १५) महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा’ असा निर्धार केला.
तिरंग्यासोबत हिरवाईचाही संकल्प
स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत नव्हे, तर देशाच्या भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रोपांची लागवड केली. लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित निगा राखण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.त्यामुळे महाविद्यालय परिसरात केवळ वृक्षारोपण न होता ‘वृक्ष जगविण्याची’ जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमास माजी मुख्याध्यापक भगवान जाधव,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेश गायकवाड,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.उमेश घोडके,प्रा. स्वप्निल बनकर,प्रा. सोमनाथ जाधव, प्रा. किशोर दांडगे,अभिषेक घोडके,योगेश सुरडकर,दीपक दळवी, शिवम कुदर, गौरव कुदर, अभिषेक कुदर, सचिन काकडे, प्रदीप घोरपडे, आनंद आठवले, शुभम लवंगे, सतीश सोटम, शंकर ढाले, संदीप बावसकर आदी उपस्थित होते.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोवलेली ही रोपे उद्याच्या हिरव्या भविष्याची बीजे ठरावीत, हाच या उपक्रमाचा मुख्य संदेश ठरला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List