नृत्य-गीतांतून घुमला आदिवासी संस्कृतीचा जागर;विद्यार्थ्यांनी दाखवली सांस्कृतिक अस्मितेची ताकद
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन :भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पारंपरिक वाद्यांचा नाद नृत्य-गीतांची थिरकणारी पावले आणि विद्यार्थ्यांच्या ओजस्वी भाषणांतून उमटलेली आदिवासी संस्कृतीची ओळख अशा उत्साहपूर्ण वातावरणात जळगाव (स.) येथील शासनमान्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण आश्रमशाळा परिसर देशभक्ती आणि आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला.कार्यक्रमासाठी गजानन तांदुळजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य आनंद चोरमारे,मुख्याध्यापक अनिल सोनवणे,सुभाष बावस्कर, चव्हाण मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य,पारंपरिक गीते आणि प्रभावी भाषणांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती,परंपरा,इतिहास आणि हक्कांची जाणीव मांडली.पारंपरिक नृत्य व गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.या कार्यक्रमास सुनील लोखंडे,मोहन चित्ते, विष्णू सोनुने,जनार्दन कराड, संजय कोरडे, सुनील रोजेकर, विजय पंडित, राजेंद्र भोपळे, सुसर मॅडम, तांगडे शिंदे, ज्ञानेश्वर दानवे, ज्ञानेश्वर तिडके, योगेश कड, सुनील कानडजे, गणेश मुंढे, गजानन रावळकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय पंडित यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत तिची समृद्ध परंपरा पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. उत्साह, देशभक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List