नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!

नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!

आधुनिक केसरी न्यूज 

शिराळा : शहरात वेगवेगळ्या अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या गल्लीत सत्तरहून अधिक नागराज मंडळे अस्तित्वात आहेत. शहरात नागपंचमी निमित्त मोठी मिरवणूक निघते. ही भव्य मिरवणूक पाहण्यासाठी देश विदेशातून हजारो पर्यटक शिराळयाला भेट देत असतात. या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाचा सुंदर पांढरा शुभ्र नागराज..!

मिरवणुकीमध्ये निघणाऱ्या गाड्यांमध्ये आपल्याच मंडळाचा देखावा व त्यासमोर आकर्षक देखावे वाजणारी वेगवेगळी वाद्य इतरांपेक्षा कसे भव्य दिव्य व दणकट आहे, या साठी या मंडळामध्ये मोठी चढाओढ सुरू असते. यात्रेमध्ये आपल्या मंडळाच्या गाड्या समोर जास्तीत जास्त पर्यटक व युवांना आकर्षित केले जाते. या आकर्षणाचा भाग म्हणून मंडळाच्या गाड्यावर सोडण्यात येणाऱ्या नागांना पाहण्यासाठी पर्यटकांचा अट्टाहास असतो.
जवळपास २३ वर्षापासून शिराळा नागपंचमी मधील जिवंत नागांच्या पूजेला बंदी होती. आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून गेल्या वर्षी काही अटी व शर्तीच्या अधीन राहून पर्यावरण तसेच वन विभागाने जिवंत नागाच्या पूजेला परवानगी दिली आहे. याचाच लाभ घेत नागराज मंडळातील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे नागराज पकडले आहेत.शिराळ्यातील नायकुडपुरा येथील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे सापडलेला पांढऱ्या रंगाचा अत्यंत देखणा व आकर्षक नाग यावर्षीच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ आणि ‘वंदे मातरम्’ अभियानाचा जोश भोकरदन शहरात गुरुवारी अक्षरशःअनुभवायला...
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक
निवेदनातून गंभीर आरोप; सत्य बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही,मोबाईल संपर्क अन् संबंधितांचे जबाब तपासण्याची मागणी
गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात