नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 

नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्यावर गुरुवारी दुपारी मुदखेड तालुक्यातील मातासाहेब देवाजी येथील गुरुद्वारा परिसरात एका शिख सेवादाराने खंजीरने हल्ला केला असून या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. या हल्ल्यात सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे हे जखमी झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल व त्यांची पत्नी तथा खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह बुधवारी धार्मिक दर्शनासाठी नांदेडमध्ये दाखल झाले होते. गुरुवारी सकाळी गुरुद्वारा परिसरात दर्शन करून ते मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मातासाहेब देवाजी येथे दुपारी दर्शन करण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते दर्शन करून पायर्या उतरत असताना गुरूद्वारा येथील निहंग पोशाखात आलेल्या सेवादाराने त्यांच्यावर शस्त्राने (तलवारीने) अचानक हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत सुखबीर सिंग बादल यांचा बचाव केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला जखम झाली असून सुरक्षा पथकात बंदोबस्तात असलेले पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे हे जखमी झाले आहेत. उपस्थितांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी शहरातील यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ला करणा-या संशयित आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय? आरोपीचा बादल यांच्याशी काही जुना विवाद होता का? अथवा यामागे काही राजकीय, धार्मिक षड्यंत्र आहे का, याचा कसून तपास पोलिस करत आहेत.

घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सचखंड गुरुद्वारा परिसर आणि यशोसाई हॉस्पिटलच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरातील वातावरण शांत मात्र तणावपूर्ण असून नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, यशोसाई हॉस्पिटलमध्ये सुखबीरसिंह बादल यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन सांगण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..! नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
आधुनिक केसरी न्यूज  शिराळा : शहरात वेगवेगळ्या अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या गल्लीत सत्तरहून अधिक नागराज मंडळे अस्तित्वात आहेत. शहरात नागपंचमी निमित्त...
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक
निवेदनातून गंभीर आरोप; सत्य बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही,मोबाईल संपर्क अन् संबंधितांचे जबाब तपासण्याची मागणी
गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात
गौलखेड गाव बिबट्याच्या दहशतीखाली; काळविटाची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती