हॉटेल संग्रामसमोरील अनधिकृत ‘यू टर्न’ ठरला जीवघेणा; दोघांचा जागीच मृत्यू

हॉटेल संग्रामसमोरील अनधिकृत ‘यू टर्न’ ठरला जीवघेणा; दोघांचा जागीच मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

कवठे येमाई : दि. १२ पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेल संग्रामसमोरील अनधिकृतपणे तोडलेल्या दुभाजक मुळे बुधवारी दि. ११ सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तरुण उद्योजक किशोर नामदेव यादव (३८, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) आणि प्रथमेश प्रकाश लाड (३०, रा. सुंदर सृष्टी, शिरूर; मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शिरूर, पारनेर व श्रीगोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
      हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचा भाग तोडल्याने येथे अनधिकृत ‘यू टर्न’ निर्माण झाला असून, वाहनचालक शॉर्टकट म्हणून त्याचा वापर करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भरधाव महामार्ग वाहतुकीत अचानक वळणारी वाहने येत असल्याने हे ठिकाण अपघातप्रवण बनले आहे.
बुधवारी सायंकाळी किशोर यादव यांच्या एंडेवर मोटारीला मागून भरधाव कंटेनरने धडक दिली. त्यानंतर मोटार दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या प्रथमेश लाड यांच्या दुचाकीवर आदळली. दोन्ही वाहने विरुद्ध दिशेला गेल्यानंतर समोरून येणाऱ्या शिवाई बसची धडक बसली. या भीषण अपघातात यादव व लाड यांचा जागीच मृत्यू झाला.
‘आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तुटलेला दुभाजक तातडीने पूर्ववत करून अनधिकृत ‘यू टर्न’ बंद करावा, तसेच या ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर व पुरेशी प्रकाशयोजना करावी, अशी मागणी होत आहे. अपघातानंतर पोलिस निरीक्षक विनोद पाटील व उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, दुभाजक कोणी तोडला, तो पूर्ववत का करण्यात आला नाही आणि अनधिकृत मार्ग सुरू राहण्यास जबाबदार कोण? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाने हा ‘मृत्यूचा यू टर्न’ कायमचा बंद करावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.- प्रा.सुभाष शेटे , ९९७५६७४२८६

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी  देगलूर : तालुक्यातील एचपी (HP), भारत गॅस (Bharat Gas) आणि इंडियन गॅस (Indane Gas) च्या...
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक
निवेदनातून गंभीर आरोप; सत्य बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही,मोबाईल संपर्क अन् संबंधितांचे जबाब तपासण्याची मागणी
गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात
गौलखेड गाव बिबट्याच्या दहशतीखाली; काळविटाची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश
तलवारीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी ५० हजारांचा दंड