गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात

आयशरमध्ये लपवलेली ३६.५६ लाखांची विषारी खेप पकडली; वाहनासह ६१.५६ लाखांचा माल जप्त

गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात

आधुनिक केसरी न्यूज 

 अमोल शिंदे 

भोकरदन  : आरोग्याशी खेळणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या तस्करीला भोकरदन पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे.सिल्लोडकडून भोकरदनकडे येणाऱ्या आयशर वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजनिवास सुगंधित पानमसाला आणि ZN-01 ZAFRANI ZARDA तंबाखूची तब्बल ३६ लाख ५६ हजार २५० रुपयांची खेप पोलिसांनी पकडली.वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ६१ लाख ५६ हजार २५० रुपये आहे.या कारवाईमुळे भोकरदनमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून केला जातो, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.१२ ऑगस्ट रोजी सकाळी  भोकरदनचे कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी  सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांना गुप्त माहिती मिळाली की, सिल्लोडहून आयशर क्रमांक R.J.09.G.E.7411 मधून प्रतिबंधित सुगंधित पानमसाल्याची खेप भोकरदनमध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पथक तयार केले.सिल्लोड-भोकरदन मार्गावरील साईप्रसाद हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळात संशयित आयशर येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबविले.चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला.चौकशीत हा माल भोकरदन येथील फिरोजखान मेहमुद खान याला पुरविण्यासाठी आणल्याचे चालकाने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

गोण्यांमध्ये दडवला होता लाखोंचा माल

पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यात राजनिवास सुगंधित पानमसाल्याचे १४,६२५ पुडे,ज्यांची किंमत २१ लाख ९३ हजार ७५० रुपये, तसेच ZN-01 ZAFRANI ZARDA तंबाखूचे १४,६२५ पुडे, ज्यांची किंमत १४ लाख ६२ हजार ५०० रुपये, असा एकूण ३६ लाख ५६ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित माल आढळला.याशिवाय २५ लाख रुपये किमतीचा सहा चाकी आयशर पोलिसांनी जप्त केला. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६१ लाख ५६ हजार २५० रुपये झाली आहे.या प्रकरणात विद्याराम श्यामलाल कश्यब (वय ४६, रा. निनवया, दौलताबाद, आग्रा, उत्तर प्रदेश) आणि फिरोजखान मेहमुद खान (रा. भोकरदन) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेंघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्यासह पो.ना. प्रशात उबाळे,पो.अ.शिवाजी जाधव, पो.अ. गणेश पिपळकर, पो.अ. अर्जुन टेकाळे,पो.अ शरद शिंदे, पो.अ. इंदल बमनावत, पो.अ.रानगोते,पो. अ. संतोष बनकर,पो.अ  चरणसिंगल यांनी केली आहे. पोलिस पथकाने केली.

भोकरदनमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांनी कायद्याचा धाक लक्षात ठेवावा. अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असून, या प्रकरणातील संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

— राहुल  बांगर, प्रभारी सहाय्यक  पोलीस निरीक्षक, भोकरदन

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी  देगलूर : तालुक्यातील एचपी (HP), भारत गॅस (Bharat Gas) आणि इंडियन गॅस (Indane Gas) च्या...
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक
निवेदनातून गंभीर आरोप; सत्य बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही,मोबाईल संपर्क अन् संबंधितांचे जबाब तपासण्याची मागणी
गुटख्याच्या काळ्या साम्राज्यावर भोकरदन पोलिसांचा घणाघात
गौलखेड गाव बिबट्याच्या दहशतीखाली; काळविटाची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश
तलवारीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी ५० हजारांचा दंड