निवेदनातून गंभीर आरोप; सत्य बाहेर काढण्यासाठी सीसीटीव्ही,मोबाईल संपर्क अन् संबंधितांचे जबाब तपासण्याची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : शहरातील उडान अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुलींबाबत मुस्लिम युवकांशी कथित प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आल्याने भोकरदन शहरात खळबळ उडाली आहे.याच पार्श्वभूमीवर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारी एक मुलगी मुस्लिम युवकासोबत पळून गेल्याचा कथित प्रकार घडल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात भोकरदन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. हा प्रकार केवळ दोन व्यक्तींमधील वैयक्तिक संबंधांचा विषय आहे की,अकॅडमी परिसरात काही नियोजित किंवा संघटित प्रयत्न सुरू आहेत, याची सत्यता तपासावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल पुरावे तपासा
अकॅडमी परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज,मोबाईल संपर्क,डिजिटल संवाद यांची तपासणी करण्यासोबतच प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचे स्वतंत्र जबाब नोंदवावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.अकॅडमीचे संचालक समीर अल्लाउद्दीन शेख तसेच संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासण्यात यावी,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तपासात कोणावर दबाव,फसवणूक, प्रलोभन किंवा अनुचित प्रभाव टाकल्याचे पुरावे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
‘आरोप की सत्य?’ पोलिस तपासाकडे नजर
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांना अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.त्यामुळे निवेदनातील आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि अफवांना खतपाणी मिळू नये, यासाठी उपलब्ध पुरावे सुरक्षित ठेवून निष्पक्ष तपास करावा, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे.
चौकशी न झाल्यास १६ ऑगस्टला ‘भोकरदन बंद’चा इशारा
निवेदनातील मागण्यांची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी; अन्यथा १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने भोकरदन बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनामुळे शहरातील वातावरणात चर्चेला उधाण आले असून, पोलिस प्रशासन या आरोपांची कशी दखल घेते आणि तपासातून नेमके काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,अधिकृत तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाबाबत निष्कर्ष काढू नये,तसेच अफवांऐवजी पोलिस तपासातून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीवरविश्वास ठेवावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List