तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
आधुनिक केसरी न्यूज
भोकरदन : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ आणि ‘वंदे मातरम्’ अभियानाचा जोश भोकरदन शहरात गुरुवारी अक्षरशःअनुभवायला मिळाला.तालुका प्रशासनाच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहराचा परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. हातात डौलाने फडकणारा तिरंगा,देशभक्तीच्या घोषणा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले.तहसील कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी शालेय विद्यार्थी,नागरिक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रॅलीत शिवाजी प्राथमिक विद्यालय,कस्तुरबा बालिका विद्यालय आणि जिल्हा परिषद प्रशाला,भोकरदन येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक विकास वाघ तसेच कस्तुरबा बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांचीही उपस्थिती होती.या देशभक्तीपर उपक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची विशेष उपस्थिती लाभली.यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण येळीकर,तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे आणि गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी डी. आर. जारवाल, शिक्षण विस्तार अधिकारी देविदास वाघ, केंद्रप्रमुख आर. आय. सोनवणे, नायब तहसीलदार अविनाश पाटील, नायब तहसीलदार बालाजी पुपलवाड, पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही रॅलीत सहभाग नोंदविला.
तिरंगा हातात घोषणांनी आसमंत दुमदुमला
विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगे आणि देशभक्तीपर घोषणांनी भोकरदनचा रस्ता अक्षरशः राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशप्रेमाची भावना पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.तालुका प्रशासन, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागामुळे ही रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्वातंत्र्य दिनापूर्वी भोकरदनमध्ये निघालेल्या या तिरंगा रॅलीने ‘देश प्रथम’चा संदेश देत राष्ट्रभक्तीचा जागर केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List