डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी

गटारी, नाले अन् साचलेल्या पाण्याने डासांची पैदास वाढण्याची भीती; नगरसेवक अब्दुल कदीर शब्बीर यांचे निवेदन

डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी

आधुनिक केसरी न्यूज 

भोकरदन : प्रभाग क्रमांक ९ मधील म्हाडा, निमरा,नूतन, शिवाजीनगर,हबीब, रफिक कॉलनी, आयेशा मस्जिद परिसरासह पुखराज, गणराज व देवराज नगरात पावसामुळे गटारी, नाले आणि साचलेल्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.याप्रकरणी नगरसेवक तथा प्रतोद अब्दुल कदीर शब्बीर (बापू) यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत आरोग्य सेवकांमार्फत नियमित पाहणी,नागरिकांमध्ये जनजागृती आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.साचलेल्या पाण्यावर अँटी-लार्वा औषधाची फवारणी,गरजेनुसार फॉगिंग आणि नगर परिषद-आरोग्य विभागाचा समन्वय साधून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.डास वाढण्याआधी उपाययोजना करा असा थेट इशारा देत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा,अशी अपेक्षा अब्दुल कदीर शब्बीर यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक