ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’

प्रियदर्शनी विद्यालयाच्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा जल्लोष; विद्यार्थी,पालकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’

आधुनिक केसरी न्यूज 

भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी भोकरदन शहर अक्षरशः दुमदुमून गेले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीचा जल्लोष उभा केला.शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली रॅली ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात शहराच्या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशभक्तीपर घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचताच वातावरण आणखी भारावून गेले. याठिकाणी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्य श्रीमती गोरे मॅडम यांनी तिरंगा आणि तिरंगा रॅलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.यानंतर पुन्हा ढोल-ताशे, लेझीम आणि देशभक्तीपर घोषणांच्या गजरात रॅली शाळेकडे रवाना झाली. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची उपस्थिती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहरावर राष्ट्रभक्तीची छाप उमटली.रॅलीत प्राचार्य श्रीमती गोरे मॅडम, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने पालक तसेच शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’ ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’
आधुनिक केसरी न्यूज  भोकरदन : ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी गुरुवारी...
डासांचा ‘डंख’ वाढला; प्रभाग ९ मध्ये प्रशासनाला जागे करण्याची मागणी
तिरंग्याच्या साक्षीने’ भोकरदन दुमदुमले; हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायकुडपुऱ्यातील कच्याड युवा शक्ती नागराज मंडळाला सापडला सुंदर शुभ्र वर्णाचा नागराज..!
नांदेड येथे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला 
देगलूर तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य; संचालक जनार्धन बिरादार यांचे आवाहन
भोकरदनच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी’ची गस्त, पोलीस चौकी अन् CCTVची मागणी;अनिता जाधव आक्रमक