तिरंग्याला सलाम अन् गावाच्या स्वच्छतेला हातभार; पारधचा अनोखा उपक्रम..!
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : स्वातंत्र्यदिन म्हटला की ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तीचा जल्लोष,मात्र पारधमध्ये यंदा स्वातंत्र्यदिनाला देशभक्तीला स्वच्छतेच्या कृतीची जोड देण्यात आली. ‘स्वच्छ भारत–सुंदर भारत’चा संदेश देत ‘माझे गाव–माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून गावातील सार्वजनिक ठिकाणी तणनाशक फवारणी अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १५ ऑगस्टचा उत्सव केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता गावाच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष काम करण्याचा दिवस ठरला.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता या अभियानाला सुरुवात झाली.जिल्हा परिषद शाळा, मातंग स्मशानभूमी, दलित स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी तसेच मुस्लिम कब्रस्तान परिसरात स्वच्छता करून तणनाशक फवारणी करण्यात आली. वाढलेले गवत, अस्वच्छता आणि सार्वजनिक परिसरातील गैरसोयी दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला.
ध्वज फडकविण्याबरोबर गाव स्वच्छ करण्याची कृती
‘स्वच्छता हीच खरी देशसेवा’ हा संदेश देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी केवळ प्रशासनावर न ढकलता स्वतःही पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील विविध समाजांच्या स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसरात एकत्रितपणे अभियान राबवून सामाजिक एकोपा आणि सामूहिक जबाबदारीचा आदर्श निर्माण करण्यात आला.या उपक्रमाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते सागर राजे देशमुख यांची होती. रमेश काटोले, दीपक दांडगे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे रवींद्र लोखंडे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक समाधान लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.मार्गदर्शक परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, माजी सरपंच अशोक पाटील लोखंडे, संपत काटोले, अरुण काकफळे, महादू दांडगे, तेजराव दांडगे, साहेबराव दांडगे, गजानन पाखरे, किरण बावस्कर, विशाल सुरडकर, अनिकेत सुरडकर, दीपक बोर्डे, दिनेश सुरडकर, रफिक शेठ, अजरखा पठाण सर, सागर दांडगे, सुनील दांडगे, स्वप्नील सुरडकर, समाधान सुरडकर, सागर बोर्डे, विवेक सुरडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List