वानराच्या मृत पिल्लाभोवती कळप जमला; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थ भावूक

वानराच्या मृत पिल्लाभोवती कळप जमला; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थ भावूक

आधुनिक केसरी न्यूज 

 त्रिसिंग जायभाये 

सुखापुरी  : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारेला शॉक लागून वानराच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मृत पिल्लाभोवती त्याच्या कळपातील अनेक वानरे जमली. मृत पिल्लाजवळ शांतपणे बसलेल्या वानरांचे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाले. मृत पिल्लाची आई अत्यंत व्याकुळ झाली होती. ती वारंवार मृत पिल्लाजवळ जाऊन त्याला गोंजारत होती. कळपातील इतर वानरेही मृत पिल्लाभोवती शांतपणे बसून एकमेकांच्या जवळ येत असल्याचे दिसून आले. एखाद्या माणसाच्या अंत्यविधीवेळी नातेवाईक मृत व्यक्तीभोवती शोकमग्न होऊन बसतात, अगदी त्याचप्रमाणे हे हृदयस्पर्शी दृश्य भासत होते.

हे दृश्य पाहून उपस्थित ग्रामस्थांनी मृत पिल्लाला तेथून उचलून नेले. माणुसकीच्या भावनेतून ग्रामस्थांनी त्याचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला व , सन्मानपूर्वक त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . मूक प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी माणुसकीचे नाते जोडणाऱ्या ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेचे उपस्थितांकडून कौतुक होत आहे. या घटनेतून वानरांनाही भावना, माया आणि नात्यांची जाणीव असल्याची प्रचिती आली. तसेच विजेच्या तारांमुळे वन्यजीवांचा जीव जाण्याच्या घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरजही या घटनेने अधोरेखित केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वानराच्या मृत पिल्लाभोवती कळप जमला; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थ भावूक वानराच्या मृत पिल्लाभोवती कळप जमला; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थ भावूक
आधुनिक केसरी न्यूज   त्रिसिंग जायभाये  सुखापुरी  : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारेला शॉक लागून वानराच्या पिल्लाचा...
वर्दी बोलली कर्तृत्व गाजले; पिआय पंकज जाधव यांना केंद्राचा ‘उत्कृष्ट सेवा’ सन्मान..!
नृत्य-गीतांतून घुमला आदिवासी संस्कृतीचा जागर;विद्यार्थ्यांनी दाखवली सांस्कृतिक अस्मितेची ताकद
तिरंग्याला सलाम अन् गावाच्या स्वच्छतेला हातभार; पारधचा अनोखा उपक्रम..!
चिमुकल्यांच्या हातात तिरंगा; भोकरदनमध्ये देशभक्तीचा जल्लोष..!
भोकरदनात तिरंग्याचा महासागर; १ किलोमीटरची अखंड तिरंगा पट ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू..!
ढोल-ताशांचा निनाद लेझीमचा थरार अन् भोकरदनच्या रस्त्यावर दुमदुमला ‘तिरंगा’